यवतमाळ जिल्हा प्रतिनिधि रजा शेख:- राष्ट्रीय पीछडा वर्ग ओबीसी मोर्चा च्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतात 567 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. हा चरनबद्ध आंदोलनाचा तिसरा टप्पा होता या करिता असंख्य ओबीसी वर्ग रस्त्यावर आले होते
ओबीसीची जातवार जनगणना झाली पाहिजे!!
ईव्हीएम मशीन वरील निवडणुका बंद झाल्या पाहिजे !
शेतमालाला योग्य भाव दर देण्यासाठी शेतमालाची हमी देणारा कायदाmsp) सरकारने बनवला पाहिजे!
लॉकडाऊन च्या काळामध्ये कामगाराच्या हिताचे जुने कामगार कायदे केंद्र सरकारने निरस्त केले. ते पुन्हा नव्याने जसेच्या तसे लागू केले पाहिजे!
खाजगीकरणाचे धोरण तात्काळ रद्द केले पाहिजे!
अश्या अनेक मुद्द्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संघटनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा !नही चलेगा!!
ओबीसीची जातवार जनगणना झालीच पाहिजे झालीच पाहिजे!!
खाजगीकरणाचे धोरण रद्द झालेच पाहिजे!
ईव्हीएम मशीन ने क्या किया देश का सत्यानाश किया!!
अशा घोषणा देत आझाद मैदान वरून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली.मोर्चाचे नेतृत्व गजानन उल्ले यांनी केले , BIN राज्याध्यक्ष सुषमा राजदीप मॅडम ,BMP च्या महासचिव सारिका भगत मॅडम,विलास भोयर, गजानन ऊले (राज्य उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा), प्रशांत मुनेश्वर, विनोद राठोड, बळीराम दिवटे ,गजानन मडावी, विनोद मुदाने ,सुरेंद्र परडके, हरीश राऊत अरुण शेंद्रे सत्यशील देवतळे, अंकुश डडमल, राजीव फुल्लके, विनय फुल्लके ,अमोल गायकवाड, विनोद राठोड, संदीप मून आशा चंदनखेडे दत्ता मेकवाड, विपुल चव्हाण ,मायाताई शेंद्रे ,सुनील गवई ,सुनीता पोपटकर, यशोदा मानकर, नंदा वाकोडे, दारासिंग तगरे, कदम सर ,आशिष काळे, देवराव साठे, प्रवीण रंगारी, नामदेव ढोकणे , सुनील मोहरले, सुरेश बेले, सुनील बेले, सुरेश राठोड ,गजानन गोडवे ,नीरज कचवे ,भीमराव भगत इत्यादी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.