नेर तालुका प्रतिनिधी मो. रजा शेख....
नेर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेच्या वतीने राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय बिछडा वर्ग (OBC) मोर्चा नेर चे मा.प्रा. मनोहरराव देशमुख हे होते , मा. अध्यक्षांच्या हस्ते मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमे ला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच उपस्थियांनी सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी माँसाहेब जिजाऊ यांचा जयघोष करण्यात आला. जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवबाच्या खऱ्या गुरु होत्या व त्यांनी दैववाद कर्मकांड या सर्व गोष्टींना बळी न पडता कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बहुजन समाजातील महिलांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन मनोहरराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षस्थानी बोलतांना केले, संघमित्राताई गायकवाड यांनी सुद्धा राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रेरणादायी व संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत असे आवाहन केले की ज्या संघर्षमय जीवनातून त्यांनी आपल्या मुलाला घडवले, तसेच आपण सुद्धा आपल्या परिवारातील मुलांच्या, पुरुषांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बहुजन विरोधी व्यवस्थेच्या विरोधात वैचारिक लढाई लढण्या करिता उभे राहण्याची हिंमत व प्रेरणा द्यावी, यावेळी प्रफुल नेरकर, प्रमोदीनिताई मुंदाने यांनी सुध्दा आपले प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे संचालन अरविंद पाटील यांनी केले तर प्रास्ताविक उमेश इंगोले यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद गायकवाड यांनी केले, यावेळी कार्यक्रमाला वासुदेवराव शेंडे सुनील गवई, अनिरुद्ध मुंदाने, रजा शेख, किशोर सांडे, राजीव डफाडे, आनंद शिरसाठ, संजय ढोक, दिनेश वांगे, अमोल घरडे सर, मुरलीधर गायकवाड, श्रावण चवरे, प्रदीप झाडे, विजय काळे, रामचंद्र शिंदे, किशोर शिंदे, श्रीकृष्ण शिंदे, अंकित सोनकुसरे, नजिम मिर्झा, समीर मिस्त्री इत्यादी उपस्थित होते