याशनी नागराजन (भा.प्र.से) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्या संकल्पनेतून
पांढरकवडा: विदर्भ प्रतिनिधी रजा शेख : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत केळापूर, वणी झरी जामणी, मारेगाव, राळेगाव, घाटंजी, बाभुळगाव, कळंब, यवतमाळ या ९ तालुक्याच्या कार्यक्षेत्रात एकुण १८ शासकिय आश्रम शाळा कार्यरत आहेत. तसेच तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी ९ शासकीय मुलींचे वस्तीगृह व १० मुलांचे वस्तीगृह चालवले जातात.
या आदिवासी प्रकल्पामार्फत व कार्यक्षेत्रातील चालविल्या जाणाऱ्या १८ शासकीय आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना, पालकांना शासकीय शाळांत दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती उदा. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती पोस्ट मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, भारत सरकार शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती व जि. प. शाळेत व इतर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा. शासकीय शाळात गावातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा त्या सोबतच या कार्यालया मार्फत आर्थिक, सामाजिक व कल्याणात्मक राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती गावागावापर्यंत पोहचावी या उद्देशाने याशनी नागराजन (भा.प्र.से) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी. यांच्या संकल्पनेतून " शासन आपल्या दारी" शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमात या कार्यालय मार्फत एक चित्रफित बनवून डिजिटल स्क्रीन लावून कार्यक्षेत्रातील सर्व कोलाम पोड, गाव, गर्दीच्या ठिकाणी पुढील १० दिवस फिरणार आहे. या चित्ररथासोबत कृषी, आरोग्य आणि इतर विभाग मार्फत हि राबविल्या जाणान्या योजनांची ऑनलाईन अर्ज हि भरुन घेतली जाणार आहे.
या चित्ररथाला याशनी नागराजन (भा.प्र.से) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाला सुरवात झाली. यावेळी या कार्यलयातील सुरेश रामटेके. गोदाजी सोनार (सहाय्यक प्रकल्प अधिकारी) संग्राम पवार (नियोजन अधिकारी) सचिन राठोड. (कार्यालय अधिक्षक) ईश्वर पवार, विश्रांत जामीनकर, रोषन कांबळे, मनोज सावत (वरिष्ठ लिपीक) स्नेहा गोडे (सांख्यीकी सहायक) नामदेव घ्यार, दिपक कांबळे, सुदाम पेंदोर, रत्नमाला सिडाम (कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी) व अनिल धुर्वे (आदिवासी विकास निरीक्षक) इतर सर्व अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित होते.