महाराष्ट्र पेंटर संघटना च्या माध्यमातुन महाराष्ट्रातील हजारों पेंटर बांधवांनी लावली हज़ेरी

 


यवतमाल विदर्भ प्रतिनिधी रजा शेख 

भारतात वाढत्या नवीन टेक्नोलोजीने हैन्ड वर्क,हस्तकला

काम करणाऱ्या 

 पेंटर बांधवाना चांगलीच अडचण

 निर्माण केली आहे, पेंटर बांधवानी आपला संसाराचा गाडा कसा चालवायचा,आपल्या मुलां,मुलीचं शिक्षण कसं करायचं ,या सर्व परिस्थितीला अनुसरून महाराष्ट्र पें,सं,चे अध्यक्ष मा.प्रमोदभाऊ अंभोरे परभणी,यांनी महाराष्ट्र व गोवा राज्यातील  जाहिरात करणाऱ्या सर्व ऍड एजंसी धारकांना निमंत्रित केले

आणि पेंटरच्या हितांची व समस्यांची जानिव करुण दिली, तसेच वॉल पेंटिंग चे रेट वाढवण्याबद्दल 

पण मुद्दा मांडला आणि पेंटरच्या समस्याची दखल घेत मुंबई मंत्रालयात पण निवेदन 

दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी निवेदंण स्वीकारले व  आम्ही हस्तकला पेंटरच्या हितांचा नक्कीच विचार करु असे आश्वासन लेखी स्वरूपात महाराष्ट्र पेंटर संघटनेला दिले..



महाराष्ट्र पेंटर संघटना चा दी,

10,7,2023, व  11/07/2023 यवतमाऴ येथे दोन दिवसीय राज्य स्तरीय मेऴावा, व स्नेह संम्मेलन ला जोरदार प्रतिसाद मिऴाला, महाराष्ट्रातील अनेक पेंटर बांधवांनी या कार्यक्रमाला जोरदार हजेरी लावली व 

महाराष्ट्र पेंटर संघटना चे अध्यक्ष प्रमोदभाऊ अंभोरे, परभणी, उपाध्यक्ष मा.अमर तांबे नागपुर, सचिव फिरोज खान वर्धा पुलगांव,  कोषाध्यक्ष सागर राठौर, छ,संभाजी नगर, व इतर पदाधिकारी  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यातुन पेंटर व ऐड एजंसी नी आपली हजेरी लावली व या कार्यक्रमाला यशस्वी केलं

Post a Comment

0 Comments