मोहन भोयर यांची जिल्हा विकास यंत्रणा सदस्यपदी निवड


 जिला प्रतिनिधि रजा शेख :-

रिपाई आठवले गटाचे पश्चिम विदर्भ प्रदेशाध्यक्ष तसेच प्रशिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक यांची जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण (दिशा) मध्ये  सदस्यपदी अविरोध निवड झाली. भारत सरकार यांच्या आदेशान्वये खासदार तथा अध्यक्ष दिशा समिती यांच्या पत्राद्वारे अनुसूचित जाती या प्रवर्गात  निवड करण्यात आली, तशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी मोहन भोयर यांना दिल्याचे कळते. केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचे मोहन भोयर हे कट्टर समर्थक म्हणून या परिसरात ओळखले जातात, त्यांचा सामाजिक व राजकीय आलेख बघता ही निवड झाल्याचे बोलले जाते, या निवडीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामाला चालना मिळेल यात तीळमात्र शंका नाही, त्यांच्या या निवडीचे सर्वत्र नेर शहरात स्वागत होत असून अनेकांनी त्यांना फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments