विदर्भ प्रतिनिधि रजा शेख
टीचर्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित पांढरकवडा पब्लिक स्कूल, पांढरकवडा शाळेने वर्ग 10वी च्या निकालामध्ये 100% निकालाची परंपरा कायम ठेवत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी शाळेतून प्रथम क्रमांक घेत कु. श्रुती अविनाश सरोदे - 92.80%, द्वितीय क्रमांक अभिजय विवेक ठोंबरे - 88.20% व तृतीय क्रमांक कु.दर्शना भास्कर गारघाटे - 79.80% गुण संपादित केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मा.श्री आनंद वैद्य,प्राचार्य श्री रितेश मुप्पीडवार,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.