पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध: वाईस ऑफ मिडिया द्वारा तहसीलदारांना निवेदन
By -
August 13, 2023
0
नेरपरसोपंत विदर्भ प्रतिनिधि रजा शेख : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहानीचा वाईस ऑफ मीडिया नेर तालुका संघटने कडून जाहीर निषेध करण्यात आला.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजनला झालेल्या मारहाणीचा नेर तहसीलचे नायब तहसीलदार सुनील जुनघरे व नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईक यांना व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनां पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. संदीप महाजन यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच लोकप्रतिनिधी हे जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेले असतात त्यामुळे संयम बाळगून कर्तव्य पार पाडावे असेही या निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे नेर तालुकाध्यक्ष राजेश धोटे, राहुल मिसळे, वसीम मिर्झा,अंकुश रामटेके,साहेबराव सावळे, प्रवीण रामटेके, अजमत खान पठाण, रजा शेख, गजानन दरोई, नवनाथ दरोई उपस्थित होते.