नेर :- भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा, व सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर ला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगाने सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणानाच्या विरोधात रस्त्यावर उतरून चक्का जाम केला, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील ६२ हजार शासकीय शाळा खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून एस.सी. एस.टी. ओ.बी.सी. मायनॉरिटी व्ही.जे. एन.टी या सर्व बहुजनांच्या मुलांचे शिक्षण संपुष्टात येण्याची परिस्थिती उभी झाली आहे, तसेच सरकारी आस्थापणेचे खाजगीकरण करून बहुजनांची शिक्षित मुले कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय या सरकारने घेतला असून हे दोन्ही निर्णय या महाराष्ट्रातील बहुजन वर्गाला अती मागासलेल्या परिस्थितीत घेऊन जाणारा आहे, याच बरोबर सांगली येथे संविधानिक मार्गाने होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावर लाठी चार्ज करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ, ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या करिता, बहुजनांचे प्रेरणास्थान पंढरपूरचे देवस्थान हे बडवे यांना देण्यात येण्याच्या षडयंत्रकारी हालचालीच्या विरोधात, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध यांचा अवमान करणाऱ्या मनोहर कुलकर्णी याला अभय देणाऱ्या सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध करत कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक जवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार पण करून या सरकारच्या निषेधार्थ मनोगत व्यक्त केले व त्यानंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मुक्ति मोर्चा ने किया चक्का जाम.
0 Comments