छ. संभाजी महाराजांच्या हत्येचा खरा इतिहास जगासमोर आणण्याची गरज :- बहुजन क्रांती मोर्चा.

 


नेर (जिल्हा प्रतिनिधी रजा शेख) छत्रपती संभाजी राजे चौक आजंती रोड येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्यवीर स्वराज्य रक्षक छ.संभाजी महाराजांच्या शहादत दिनानिमीत्य अभिवादन करण्यात आले, या अभिवादन कार्यक्रमाला सहयोगी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व  बहुजन समाजातील जनता सुद्धा उपस्थित होती, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.सुभाष महल्ले पाटील माजी सरपंच टाकळी हे उपस्थित होते, छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेला मा. अध्यक्षांच्या हस्ते व विदर्भ न्यूज चे संपादक मा नवनाथजी दरोई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थित जनसमुदायाने सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी छत्रपती संभाजीराजे यांचा जयघोष करण्यात आला व जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, छत्रपती संभाजी राजे अति बलवान असून विद्वान पंडित सुद्धा होते, वयाच्या चौदाव्या वर्षात त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ सुद्धा लिहिला होता व ते अनेक भाषा पारंगत सुद्धा होते, वयाच्या 32 व्यां वर्षात महाराजांचा खून मनुस्मृतीनुसार झाला परंतु आज पर्यंत छत्रपती संभाजी राजांच्या खुनाचे रहस्य जगासमोर  आले नाही त्यांचा खरा इतिहास बहुजन समाजापासून लपवण्यात आला अशी खंत मा. मायावतीताई मोखाडे यांनी व्यक्त केली, छ. संभाजी महाराजांचा वध औरंगजेबाने केला तेव्हा छत्रपती संभाजी राजांचे पुणे राज्य हे मुघलांचे राज्य म्हणून प्रस्थापित व्हायला पाहिजे होते परंतु तिथे पेशवाई कशी प्रस्थापित झाली, औरंगजेबाचे हस्तक होऊन पेशव्यांनी तर संभाजी राजांना कट कारस्थान रचून औरंगजेबाच्या स्वाधिन केले असावे असा खडा सवाल भारत मुक्ती मोर्चाचे तालुका संयोजक सुनील गवई यांनी उपस्थित केला,  यावेळी प्रवीण चांदोरे यांनी सुद्धा छ संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत अभिवादन केले, कार्यक्रमाचे संचालन अरविंद पाटील यांनी केले व प्रास्ताविक राजीव डफाडे यांनी केले व आभार प्रदर्शन अनिरुद्ध मुंदाने यांनी केले यावेळी वासुदेवराव शेंडे, ज्ञानेश्वरजी सरदार, मुरलीधर गायकवाड, दिनेशजी वांगे, अनिल मिसळे, इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.