जिल्हा प्रतिनिधी रजा शेख क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारात महिला सशक्ती करण्याची ताकद :- बहुजन क्रांती मोर्चा. नेर (रजा शेख) :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेच्या वतीने स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच उपस्थित समुदायाने सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या मा.मायावतीताई मोखाडे उपस्थित होत्या, सावित्रीबाईंनी फार हाल अपेष्टा सहन करून महिलांच्या शिक्षणाची वाट मोकळी केली व शिक्षणामुळे स्त्री ही पुरुषाच्या बरोबर कार्य करायला लागली मोठमोठे पदे सुद्धा भूषवली आज शिक्षण महाग करून व सरकारी शाळा बंद करून शिक्षण संपवण्याचे कटकारस्थान सुरू आहे याच्या विरोधात महिलांनी समोर आले पाहिजे असे मा. मायावतीताई मोखाडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात मत व्यक्त केले, केवळ शिक्षणानेच ज्ञान प्राप्ती होऊ शकते व मनुष्य सशक्त होऊ शकतो विज्ञानाच्या व तत्त्वज्ञानाच्या शिक्षणामुळेच मनुष्याचा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन मौर्य क्रांती संघाच्या प्रदेशाध्यक्ष मा प्रमोदिनी मुंदाने यांनी केले, आजच्या युगात महिलांना अभ्यास व तत्त्वज्ञानाच्या प्रवाहातून भटकवण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे महिलांचा महापुरुषांच्या व महानाईकांच्या संदर्भात अभ्यास कमी होत चालला असून मनोरंजनाकडे आजची स्त्री वळत आहे त्यामुळे आज कुठेतरी सावित्रीबाईंच्या त्यागाचा विसर आजच्या महिलांना पडला की काय असा प्रश्न राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या संघटक मा.शालूताई बोदीले यांनी व्यक्त केला, याच बरोबर मा. उमेश इंगोले, मा. प्रफुल नेरकर व मा.प्रवीण चांदोरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन अरविंद पाटील यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध मुंदाने यांनी केले आभार प्रदर्शन राजीव डफाडे यांनी केले, यावेळी प्रीती गवई, मुरलीधर गायकवाड,अरविंद कुळमेथे, दिनेश वांगे, सुदर्शन डफाडे, रजा शेख, सुनील गवई, प्रवीण रंगारी, दिनेश कुंमरे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.