उज्ज्वला योजनेची शेगडी अडगळीत, वयोवृद्धांची सरपणासाठी धडपड


 नेरपरसोपंत रजा शेख: मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे. निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला जाणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश रसातळाला गेल्याचे चित्र शहरातील बहुसंख्य भागातून पुढे येत आहे.

या योजनेचा प्रचंड गाजावाजा करून मोदींनी गरिबांची मते मिळविली. महागाई कमी करण्याऐवजी सत्तेत आल्यानंतर त्यांनी महागाईचे दिवस आणले. वाढत्या महागाईतून अनेकांना गॅस सिलेंडर भरून आणता येत नसल्याने अनेकांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळालेली शेगडी अडगळीत टाकली आहे.पंतप्रधानांनी सत्तेत येण्यासाठी सामान्य जनतेला या योजनेचे गाजर दाखविलेच कशाला असा प्रश्न गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षांनी उपस्थित करीत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

   उज्वला गॅस योजनेच्या अपयशावर गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी मोदी सरकारवर प्रचंड टीका करीत त्यांच्यापुढे यवतमाळ शहर व जिल्ह्यातील वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गेडाम म्हणाले की, मोदी सरकारने १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशमधील बलिया येथे पीएम उज्ज्वला योजनेची मुहूर्तमेढ रोवली.या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटूंबांना घरगुती गॅस (एलपीजी गॅस) कनेक्शन मोफत देण्यात आले.योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीपेक्षा मोदी सरकारने त्याचा प्रचंड गाजावाजा केला त्यामुळे सर्वसामान्यांनांच्या मुखातून या योजनेविषयी स्तुतीसुमने ऐकू येत होती. परंतु २०१६ पासून आजपर्यंत देशात महागाईमुळे आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. पूर्वी ४५० रुपयांचा मिळणारा गॅस सिलेंडर आता १ हजार १३६.५० रुपयांपर्यंत पोचला आहे.मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी महागाई रोखण्याचे आश्वासन दिले होते याच बळावर त्यांनी मताधिक्य मिळविले परंतु त्यांना सत्तेत येताच सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जगणे कठीण करुन सोडल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आला. पेट्रोल आणि गॅस या दोन्ही वस्तुचे भाव दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील गोरगरीब जनता पुन्हा चुलीकडे वळल्याची दिसून येत आहे. शहरातील वयोवृध्द सरपणासाठी शहराच्या आजुबाजुला असलेल्या शेतांच्या बांधावर सरपणासाठी फिरतांना दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.