
नेर :- (जिल्हा प्रतिनिधी रजा शेख) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नेर येथे बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा व सर्व सहयोगी संघटनेच्या वतीने बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी जीवाचे रान करून बहुजन चळवळीला मजबूत करण्याचं काम व महापुरुषांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी बहुजन चळवळीला समर्पित दिवंगत मा. प्रा.पी.एस.आठवले सर यांच्या विचारांना व कार्याला अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते मा.वासुदेवराव शेंडे सर हे होते मा.अध्यक्ष व भारत मुक्ती मोर्चाचे मा बळवंत खडसे साहेब यांच्या हस्ते दिवंगत मा.प्रा.पी.एस.आठवले सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व जनसमुदायांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याची पावती देत राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या तालुका अध्यक्ष मा संगमित्राताई गायकवाड यांनी सरांच्या आठवणींना उजाळा दिला व सरांचे कार्य हे बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी होते व त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले व कॅडर बेस कार्यकर्ते तयार करून या कार्याला नेर तालुक्यामध्ये दिशा दिली असे त्यांनी प्रतिपादन केले, आठवले सरांसारखा निष्ठावान कार्य करणारा कार्यकर्ता आमच्यातून निघून गेला, ही तयार झालेली पोकळी भरून निघणार नाही त्यांचे राहिलेले कार्य आपण सर्व एकत्रित येऊन पूर्ण करू असे प्रतिपादन माननीय गजानन गवई सर यांनी केले, आम्हाला सरांनी कॅडर बेस तयार करून बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी लढणे शिकवले व आमच्यामध्ये महापुरुषांची विचारधारा पेरून सरांनी आम्हाला तयार केले, महापुरुषांच्या विचारधारेचा धागा हा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य आमच्यात तयार केलं असे मत भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष माननीय सुखलालजी देशपांडे यांनी व्यक्त केले या व्यक्तिमत्त्वाने मला मराठा सेवा संघात काम करत असताना बहुजन क्रांती मोर्चा सोबत जोडण्याचे काम केले त्यांच्या काम करण्याची पद्धत हे बहुजन समाजाला समर्पित होती व सदैव एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी धर्म परिवर्तित लोकांसाठी ते सदैव कार्य करत होते असे मत मा.प्रा.मनोहरराव देशमुख यांनी व्यक्त केले विद्यार्थी दशकात असताना आम्हा विद्यार्थ्यांची सरांनी फार काळजी घेतली व प्रत्येक वेळेस सहकार्य केले विद्यार्थी घडवण्याचे कार्य व त्यांच्या अडचणींना सोडवण्याचे काम प्रामुख्याने सरांनी केले सर निरंतर आमच्या स्मरणात राहतील असे प्रतिपादन भारतीय विद्यार्थी मोर्चाचे रोशन दहिवले यांनी केले, याच बरोबर मा. मायावतीताई मोखाडे, डॉक्टर अशोक खोब्रागडे, व शालिनी बोदीले मॅडम यांनी सुद्धा आपले अभिवादन पर विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे संचालन अरविंद पाटील यांनी केले व प्रास्ताविक मा.बीमोध मुधाने यांनी केले व आभार प्रदर्शन मा. प्रज्ञाताई मोखाडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला मनोरहराव मुंदाने, दिवाकर मनवर, सुनील गवई, प्रमोदजी गायकवाड, अनिरुद्ध मुंदाने, भरत गवई, रजा शेख, राजीव डफाडे, सिद्धार्थ ढवळे सर, अनिल मिसळे, प्रीती गवई, साखी मोखाडे, इत्यादी उपस्थित होते
0 Comments