राजे मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी.

 


नेर :-जिल्हा प्रतिनिधी  रजा शेख  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, बहुजन क्रांती मोर्चा व सर्व सहयोगी संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे राजे सुभेदार मल्हारराव होळकर यांची 330 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. प्रा. निलेश मोखाडे उपस्थित होते माननीय अध्यक्ष व दिनेश वांगे साहेब यांच्या हस्ते मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थित जनसमुदायाने सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले व त्यांचा जयघोष करण्यात आला जयघोषणे  परिसर दुमदुमून गेला, राजे मल्हारराव होळकर यांनी आपल्या कर्तृत्वाच्या भरोशावर अठरापगड जातींना सोबत घेऊन अटकेपार झेंडा रोवला, त्यांचा आदर्श विचार विचारात घेऊन सर्व समाजाला एकत्रित करून आपण सुद्धा आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढावी असे प्रतिपादन प्रोटॉन संघटनेचे मा.प्रा.निलेश मोखाडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात केले. याचबरोबर मा.प्रा. मनोहरराव देशमुख यांनी सुद्धा आपले प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे संचालन अरविंद पाटील यांनी केले व प्रास्ताविक उमेश इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपालजी कोल्हे, यांनी केले, यावेळी वासुदेवराव शेंडे, अरविंद कुळमेथे सर, सुनील गवई, अनिरुद्ध मुंदाने, दिनेश वांगे, रजा शेख, गजानन उघडे, शामभाऊ पवार, कांबळे सर, मते भाऊ इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.