कृषी महोत्सवात बीएसएनएल स्टॉल ठरला ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

 


नेर :- (जिल्हा प्रतिनिधी रजा शेख) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ येथे कृषी महोत्सव 2023 मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या महोत्सवात बचत गटांनी तयार केलेले अनेक पदार्थ व साहित्य , कृषी साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्या ,घरगुती मसाले, पदार्थ, जैविक खते, अनेक कंपन्यांची प्रॉडक्ट, कृषी साहित्य, अवजारे ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, अनेक प्रकारची फळबीज, भाज्या बिज, तसेच अनेक प्रकारची विविध स्टॉल कृषी महोत्सवात पाहायला मिळाली, त्यामुळे बघ्यांना व शेतकऱ्यांना एक प्रकारची मेजवानी या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने ठरली त्यात यवतमाळ येथील बीएसएनएल ने आपला स्टॉल टाकून  बीएसएनएल ची उत्पादने व बीएसएनएलचे सिम कार्ड अत्यंत कमी दरात विकून ग्राहकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली, या बीएसएनएलच्या स्टॉलवर ग्राहकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली, कालपर्यंत बीएसएनएल ने 137 ग्राहकांना सिम कार्ड विकून फक्त  49 रुपयात ग्राहकांना सिम कार्ड दिलेत त्यात दर दिवशी दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग 45 दिवस व्हॅलेडीटी असे अनेक फायदे या सिम कार्ड मध्ये आहेत ही स्कीम फक्त कृषी मोसा दरम्यानच असल्याची माहिती बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता नरेंद्र गद्रे यांनी दिली, या स्टॉलला अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींनी भेट दिल्या असून या स्कीम चा फायदा घेतला आहे, ग्राहकांनी शेतकऱ्यांनी तथा सामान्य व्यक्तींनी या स्टॉलला भेट देऊन यास संधीचा फायदा घ्यावा असे बीएसएनएलच्या वतीने कळविण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.