कापसाला योग्य भाव मिळेपर्यंत शांत बसणार नाही----

 जिल्हा प्रतिनिधी रजा शेख


  वणी येथील शासकीय विश्रामगृहाच्या हाऊसमध्ये बळीराजा पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. 

या बैठकीस बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते  उपस्थित होते.

सध्या राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे शेतकर्यांच्या कापुस खरेदी या  ज्वलंत प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत आहे.परंतु कापसाला जो पर्यंत योग्य भाव मिळत नाही व जोपर्यंत शासनाकडुन कापुस खरेदी सुरू होत नाही.तो पर्यंत बळीराजा पार्टी स्वस्थ बसणार नसल्याचे रास्ते यांनी सांगितले.


आगामी काही दिवसांमध्ये कापुस खरेदी,वणी परीसरातील भुमीपुत्रांना प्राधान्याने विविध कंपन्यामध्ये रोजगार देणे, नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे सुरु करणे, वणी तालुका संपुर्ण प्रदूषण मुक्त करणे या प्रमुख मागण्यांसाठी जन आंदोलन उभे करणार असल्याचे जाहीर केले.या प्रसंगी जेष्ठनेते नरेंद्र तराले,मनिष वासे विदर्भ संघटक बळीराजा पार्टी ,वणी विधानसभा अध्यक्ष  रामदास पखाले ,अँड.चंदु भगत,उपाध्यक्ष बळीराजा पार्टी ,शरद पेचे,काशिनाथ देवाडकर,मनोहर मोहीतकर,राहुल पितुरकर,प्रदीप होकम,धनराज तुरणकर,राजु वांडरे,ई मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.