आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका मा.वच्छला निंबर्ते यांचा सेवानिवृत्ती समारोपीय कार्यक्रम संपन्न. नेर (प्रतिनिधी रजा शेख):- राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या जिल्हा अध्यक्ष, ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी जिवाचे रान करणाऱ्या बहुजन चळवळीतील निष्ठावान नेतृत्व करणाऱ्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका, कस्तुरबा गांधी प्राथमिक शाळा अजंती येथून सेवानिवृत्त झाल्यात, त्यांनी आपल्या शिक्षकी कार्यकाळामध्ये अनेक विद्यार्थी घडवत शिक्षण सेवेला न्याय दिला याचबरोबर त्यांचे सामाजिक चळवळींमध्ये सुद्धा योगदान आहे, जिजामातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवबाच्या शिकवणीवर त्यांनी समाजामध्ये जाऊन मावळा कसा असावा याचे सुद्धा प्रबोधनात्मक विचार समाजापर्यंत पोहोचवले, अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका मा.वच्छला निंम्बर्ते यांचा सेवानिवृत्तीचा समारोपीय कार्यक्रम राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या व भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने संपन्न झाला, यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या सर्व सदस्यांनी त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो , व बुके देऊन त्यांचा गौरव केला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.कुंदा तोडकर मॅडम उपस्थित होत्या, व प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता मा. सुरेश मडावी साहेब हे होते विशेष उपस्थितीत राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष मा.मनोहरराव देशमुख, मा. प्रमोदीनी मुंदाने मौर्य क्रांती संघ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला प्रकोष्ट, रा.मु.महिला संघ उपाध्यक्षा मा.कुमुदिनी हिंगासपुरे, मा.पूजा आडे, मा.सुनीता कांबळे, मा.उषा गवई याच बरोबर त्यांच्या परिवारातील पती मा.मुरलीधरजी राघोर्ते व मुलगा सुयोग राघोर्ते सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन चंदा मिसळे यांनी केले तर प्रास्ताविक संघमित्रा गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पायल शेंडे यांनी केले यावेळी प्रज्ञा मोखाडे, सोनाली देशपांडे, मीनाक्षी गवई, निता पाटील, रीना शेंडे, विद्या गायकवाड, शाहाजमा रजा शेख, नलिनी सतदेवे, प्रीती गवई, नलू रंगारी, वंदना खंडारे, वंच्छला मडावी, कुळमेथे मॅडम, करुणा खडसे, रुपाली मिसळे, भारती हरडे , जया आढोडे, प्रेमलता शेंडे, ज्योती वासनिक, मीना घारोट, सुनीता कांबळे, उमाताई वाळके , मालिनी राठोड, ताई राठोड इत्यादी उपस्थित होते तसेच बामसेफ, प्रोटॉन, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, व सर्व सहयोगी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.