बहुजन मुक्ती पार्टी नेर तालुका अध्यक्ष पदी मा.प्रवीण भाऊ रंगारी यांची नियुक्ती.


  नेर (रजा शैख) :- ओबीसी जातनिहाय जनगणनेचा प्रश्न निरंतर उचलणाऱ्या व ईव्हीएम मशीनला विरोध करून आंदोलन करणाऱ्या बहुजन मुक्ती पार्टी च्या नेर तालुका अध्यक्षपदी मा. प्रवीण भाऊ रंगारी यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली, प्रवीण भाऊ रंगारी हे बहुजन चळवळीत अग्रेसर असून वारंवार होणाऱ्या बहुजनांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढणारे व ओबीसीच्या जातनिहाय जनगणने करिता जेलभरो आंदोलन करणारे तडफदार, वकृत्ववान नेतृत्व आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रीय हितासाठी लोकशाही जिवंत ठेवण्याकरिता संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी अनेक मुद्दे घेऊन आंदोलन केली आहेत. त्यामुळे त्यांची ख्याती चांगल्या प्रकारे असून सुस्पष्ट व प्रामाणिक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे बहुजन चळवळीला ते समर्पित असून त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे,व सर्व संघटनांनी त्यांचे स्वागत केले आहे बहुजन समाजाला प्रवीण भाऊ रंगारी यांच्याकडून अनेक सामाजिक अपेक्षा असून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.