जागतिक महिला दिनी ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

 नेरपरसोपंत रजा शेख :-

 


येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे) महिलांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील डॉ. माला गायनर, डॉ. कल्पना सुरजूसे, डॉ. रूपाली नरोटे, स्नेहल निंबाडे, शितल वैद्य, अश्विनी उईके, मनीषा कापडे, सुप्रिया मालटे यांना पुष्प गुच्छ देउन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशाली मासाळ, नेर तालुका महिला प्रमुख अर्चना इसाळकर, ऍड. रश्मी पेटकर(शहर प्रमुख), वनिता मिसळे(माजी नगराध्यक्षा न.प.नेर) पल्लवी देशमुख(शहर संयोजीका) लता काळे, सारिका महल्ले, सुषमा कदम, माधुरी आठवले व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.