आगामी लोकसभेत निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन वापरल्यास संपूर्ण भारतात ईव्हीएम मशीन फोडू :- मा.वामन मेश्राम.

 जिल्हा प्रतिनिधी रजा शेख
आर्णी :- ईव्हीएम यंत्रामध्ये घोटाळा करून काँग्रेस व बीजेपी सरकार सत्तेत आली व या घोटाळ्यामध्ये निवडणूक आयोग सहभागी आहेत असा गणाघाती प्रहार भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांनी केला. कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा सुरू असून त्याचे नेतृत्व मान्य मेश्राम साहेब हे करत आहे, बहुजन समाजाला जागृती करण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून करतन्यात येत आहे, ही यात्रा आर्णी मध्ये आली असता आर्णी येथील जनतेने या रॅलीचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केले, व कार्यक्रमाला बहुजन जनसागर उसळला, ईव्हीएम मशीन लोकशाहीची हत्या करणारे यंत्र असून या मशीनमुळे जनमानसांचे मताधिकार शून्य झाले आहे, जनता वेळेस जागृत झाली नाही तर येणाऱ्या काळात याचे परिणाम संपूर्ण बहुजन समाजाला भोगावे लागतील, व निवडणूक आयोगाने २०२३ पर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही व आगामी निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा वापर न करता ईव्हीएम चा वापर केल्यास ईव्हीएम फोडण्याचा कार्यक्रम हा भारतभर राबवू असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.     मेश्राम साहेब म्हणाले 2004 पासून काँग्रेस व बीजेपी ईव्हीएम यंत्राद्वारे घोटाळा करून सत्ता मिळवत आहे. या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयात सर्व पुरावे आम्ही सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम द्वारे पारदर्शित निवडणुका होऊ शकत नाही असे निर्वाळा दिला, त्यानंतर ईव्हीएम च्या जोडीला पेपर ट्रेल  यंत्र लावण्याचा सल्ला दिला, पेपर ट्रेल मुळे ईव्हीएम मध्ये होणारा घोटाळा पकडता येऊ शकते यामुळे त्या विरोधात काँग्रेसने न्यायालयाचा 50% पेपर ट्रेल मधून निघणारी चीट ची फेरमोजणी ईव्हीएम मध्ये होणाऱ्या मतांच्या सोबत करण्यात यावी अशी याचिका दाखल केली, परंतु त्यावेळी 50% ऐवजी एक टक्का फेर मतमोजणी करावी असे आदेश देण्यात आले, या कालावधीत झालेल्या निवडणुकीत पेपर ट्रेल यंत्रातील मतांची फेरमतमोजनीचा अधिकार वापरण्यात आला नाही, त्यामुळे भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने संपूर्ण भारतात जनजागृतीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. प्रदीप वादाफळे, प्रदेशाध्यक्ष ओबीसी आरक्षण समर्थक परिषद महाराष्ट्र राज्य हे होते , या कार्यक्रमाला राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. कुंदाताई तोडकर, मौर्य क्रांती संघाच्या महिला प्रकोष्ट प्रदेश अध्यक्षा मा. प्रमोदिनीताई मुंदाने, बहुजन मुक्ती पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव मा. सारिका भगत, व तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या प्रदेश महासचिव सुषमाताई राजदीप, या रनरागीनिंनी निवडणूक आयोग व सरकारला  धारेवर धरत १५ लाख EVM मशीन तोडण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला मा. अॅड अनिल किनाके, मा. विजयराज शेगेकर, मा. मौलाना साजिद अहमद रसोदी, मा.तिलक नाईक यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाला बहुजन बहुजन समाजातील सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या तसेच आर्णीतील जनसागर उपस्थित झाला होता, कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा व सर्व सहयोगी संघटना आर्णी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.