रमजान महिन्यात विद्युत भारनियमन रद्द करा भारत मुक्ती मोर्चाचे निवेदन.

 


नेर :- (जिल्हा प्रतिनिधी रजा शेख)पाक रमजान महिना सुरू झाला असुन या रमजान महिन्यामध्ये विद्युत वितरण कंपनीने विद्युत भारनियमन रद्द करावे असे निवेदन भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून मा.तहसीलदार साहेब यांच्या हस्ते मा. मुख्यमंत्री तथा मा.ऊर्जा मंत्री यांना देण्यात आले व प्रतीलिपी मा.अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता यवतमाळ व सहाय्यक अभियंता नेर यांना सुध्दा देण्यात आले.

             या पाक रमजान महिन्या मध्ये सर्व मुस्लिम बांधव रोजे करतात, उन्हाळ्याच्या काळात रोजे करत असतांना त्याच्या रोजच्या दिनचर्येत विद्युत भारनियमनामुळे अडथळा निर्माण होऊ नये या करिता सर्व सामाजिक बहुजन संघटनेच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले यावेळी वासुदेवराव शेंडे, अनिरुद्ध मुंदाने,दिनेश कुमरे, उमेश इंगोले ,मो.दानिश, सुनील गवई, राजीव डफाडे, रजा शेख, साजिद माजीद खान, प्रवीण रंगारी, शोएब खान, मोहम्मद अझीम, संदीप मिसळे, शेख राजिक शेख रहीम, अशोक फुलझेले, मंगेश नदुरणे, जगदीश सव्वालाखे इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.