२० सप्टेंबर पुण्यात होत असलेल्या सत्यशोधक संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते होणार सहभागी.
By -
September 23, 2023
0
यवतमाळ :- २४ सप्टेंबर २०२३ रोजी भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने सत्यशोधक संम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. याच दिवशी १५० वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, सत्यशोधक समाजाची स्थापना करत असताना त्यांनी जो उद्देश निर्धारित केला होता त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी त्यांनी बहुजन समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेतले होते. बहुजन समाज हा धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक, व आर्थिक दृष्ट्या गुलाम होता, या गुलामीतून बहुजन समाज मुक्त करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून वैचारिक आंदोलन उभे केले होते. त्यांच्या निर्वाणा नंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे,छ. राजर्षी शाहू महाराज, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, यांनी हे आंदोलन चालवले . विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना सामाजिक गुरु मानुन हे आंदोलन तहहयात चालवले. १९७८ ला मान्यवर कांशीरामजी, यशकायी डि.के.खापर्डे व मा. दिनाभानाजी व त्यांच्या सहकार्यांनी जी बामसेफ ची निर्मिती केली ते म्हणजे सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवनच होते. वर्तमान परिस्थितीत या आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे. भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने सत्यशोधक समाज स्थापनेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आम्ही साजरा करत असताना फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अनुयायांना आम्ही सहर्ष आमंत्रित करीत आहोत. कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री हे आहेत. तर अध्यक्षता भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब हे करत आहेत. संम्मेलनाला मुख्य अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मा.प्रवीणदादा गायकवाड, प्रसिद्ध इतिहास संशोधक मा.म.देशमुख, हमाल पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा आढाव हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या संमेलनाला विशेष अतिथी म्हणून आमदार मा. रोहित पवार, बामसेफ राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.व्ही.व्ही.जाधव, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कुंदाताई तोडकर, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे, भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय कार्याध्यक्ष ऍड.माया जमदाडे, राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ राष्ट्रीय महासचिव घनशाम अलामे, आय.एल.पी.ए. चे राज्य पदाधिकारी वासंती नलावडे बहुजन क्रांती मोर्चा संयोजक विठ्ठल सातव, ज्येष्ठ लेखक तथा अभ्यासक राजर्षी शाहू महाराज साहित्यिक डॉ.प्रा.जे.के.पवार, इम्पा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाने, राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हिजबुल रहेमान, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मैदान आर.टी.ओ. ऑफिस च्या शेजारी पुणे येथे होणाऱ्या सामाजिक व ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. प्रतिभाताई उबाळे, प्रदेश संयोजक सचिन बनसोडे, व महिला आघाडी अध्यक्ष संगीता ताई शिंदे यांनी केले. या सत्यशोधक संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील बहुजन समाजाने बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा मा.सुनील गवई,भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांनी केले आहे.
Tags: